Thursday 3 November 2011

जीवन अपुले सुंदर आहे़! सौंदर्याचे मंदिर आहे!!

 

 

जीवन माझे सुंदर आहे !

सौंदर्याचे मंदिर आहे !

पदोपदी नी क्षणोक्षणी रे,

हृदयच माझे सांगत आहे, कि,

जीवन माझे सुंदर आहे !

सौंदर्याचे मंदिर आहे !

 

 

 

ह्याच नद्या, नि, हेच किनारे,

पशू-पक्षी, अन् , हे खट्याळ वारे,

येऊन मजला सांगत आहेत, कि,

जीवन माझे सुंदर आहे !

सौंदर्याचे मंदिर आहे !

 

 

 

बालपणीचे सवंगडी ही,

आई-वडील नी भावंडे ही,

प्रियजन, अन् गुरुजन माझे,

हेच मला रे सांगत आहेत, कि,

जीवन माझे सुंदर आहे !

सौंदर्याचे मंदिर आहे !

 

 

 

एकट्यात मी विचार करता,

मन माझे शोधते आता,

कि, काय असे, जे, मला मिळाले,

ज्याने, कुरुप नी दुःखी, जीवन माझे,

एकाएकी सुंदर झाले?

 

 

 

मलाच, माझे, कळले आता, कि,

सौंदर्यदृष्टि मलाहि येता,

जीवन माझे सुंदर झाले !

सौंदर्याचे मंदीर झाले !

 

 

 

रडणे, पडणे, अन् अडणे,

टाकून दिले मी मरगळणे,

नव्या बळाने, हसतमुखाने,

आता, मी हे गातो गाणे, कि,

जीवन माझे सुंदर आहे !

सौंदर्याचे मंदिर आहे !

 

 

जिकडे, तिकडे, चहुकडे ,

सुंदरताच नजरेस पडे,

मग, विनाकारणच, का रे दुःखी होता ?

सौंदर्याची, नवी ही दृष्टी, आत्मसात करु या आता,

नि, एकमुखाने म्हणू या सारे, कि,

जीवन अपुले सुंदर आहे !

सौंदर्याचे मंदिर आहे !

Tuesday 1 November 2011

फुलासारखी आई!

फुलासारखी आई, माझी फुलासारखी आई !

फूल जसे, गोड हसे, हसते माझी आई ऽ..ऽऽऽ......

फूल जसे, गोड हसे, हसते माझी आई !

पण, सुंदर त्याहूनही, आहे, माझी ही आई!

फुलासारखी आई, माझी फुलासारखी आई !!

 

 

(मी चोरुन साखर खाल्ल्यानंतर ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰)

 

चोर दिसे, मार बसे, राग तिला येईऽ..ऽऽऽ

चोर दिसे, मार बसे, राग तिला येईऽ..ऽऽऽ

सापडलो हाती, आता माझी धडगत नाही,

पण, काळसरे, वाट मिळे, आई विसरूनि जाईऽ...ऽऽऽऽऽ

आई विसरूनि जाईऽ...ऽऽऽऽऽ!

आणि मग, फुलासारखी आई, माझी, फुलासारखी आई !

फुलासारखी आई, माझी, फुलासारखी आई !!

 

 

कधी, कधी, बळजबरी,

दूर ढकलते आईऽ...ऽऽऽऽ

कधी, कधी, बळजबरी,

दूर ढकलते आई !

पण, वाट सदा पाही ती अपुल्या

राजकुमाराचीऽ..ऽऽऽ

फुलासारखी आई, माझी, फुलासारखी आई !

फुलासारखी आई, माझी, फुलासारखी आई !!

 

 

 

जिथे, तिथे, मन म्हणते,

आई ग आईऽ..ऽऽऽईई,

आई ग आई,

क्षणा क्षणाला रे,

आठवते अपुली आई

हृदयच माझे आहे गाते आणि म्हणते आईऽ..ऽऽऽऽ

आई,आई,आई,आई,आई,आई,आईऽ..ऽऽऽऽ

आई,आई,आई,आई,आई,आई,आईऽ..ऽऽऽ

आई,आई,आई,आई,आई,आई,आईऽ..ऽऽऽऽऽ

फुलासारखी आई, माझी, फुलासारखी आई !