Thursday 3 November 2011

जीवन अपुले सुंदर आहे़! सौंदर्याचे मंदिर आहे!!

 

 

जीवन माझे सुंदर आहे !

सौंदर्याचे मंदिर आहे !

पदोपदी नी क्षणोक्षणी रे,

हृदयच माझे सांगत आहे, कि,

जीवन माझे सुंदर आहे !

सौंदर्याचे मंदिर आहे !

 

 

 

ह्याच नद्या, नि, हेच किनारे,

पशू-पक्षी, अन् , हे खट्याळ वारे,

येऊन मजला सांगत आहेत, कि,

जीवन माझे सुंदर आहे !

सौंदर्याचे मंदिर आहे !

 

 

 

बालपणीचे सवंगडी ही,

आई-वडील नी भावंडे ही,

प्रियजन, अन् गुरुजन माझे,

हेच मला रे सांगत आहेत, कि,

जीवन माझे सुंदर आहे !

सौंदर्याचे मंदिर आहे !

 

 

 

एकट्यात मी विचार करता,

मन माझे शोधते आता,

कि, काय असे, जे, मला मिळाले,

ज्याने, कुरुप नी दुःखी, जीवन माझे,

एकाएकी सुंदर झाले?

 

 

 

मलाच, माझे, कळले आता, कि,

सौंदर्यदृष्टि मलाहि येता,

जीवन माझे सुंदर झाले !

सौंदर्याचे मंदीर झाले !

 

 

 

रडणे, पडणे, अन् अडणे,

टाकून दिले मी मरगळणे,

नव्या बळाने, हसतमुखाने,

आता, मी हे गातो गाणे, कि,

जीवन माझे सुंदर आहे !

सौंदर्याचे मंदिर आहे !

 

 

जिकडे, तिकडे, चहुकडे ,

सुंदरताच नजरेस पडे,

मग, विनाकारणच, का रे दुःखी होता ?

सौंदर्याची, नवी ही दृष्टी, आत्मसात करु या आता,

नि, एकमुखाने म्हणू या सारे, कि,

जीवन अपुले सुंदर आहे !

सौंदर्याचे मंदिर आहे !

No comments:

Post a Comment