Monday 19 March 2012

स्वप्नाळू

 

 

 

घेउनी इच्छा अंतरीच्या

स्वप्नांमध्ये बागडतो ;

‘स्वप्न-वडाच्या’ पारंब्या ह्या

निज - नित्य मी झुलतो !

 

 

स्वप्नातल्या स्वप्नभूमिवरी

‘स्वप्न-बीज’ मी पेरितो ;

स्वप्नातल्या जीवनी मी

‘स्वप्न-बागाच’ फुलवितो !

 

 

 

नीज - दु:खांचा फटका कधी

स्वप्नातही कडकडतो ;

‘स्वप्न’ म्हणोनी कधी-कधी मी

‘शहारेच’ पाहतो !

 

 

 

‘स्वप्नातला लढवय्या’ मी

स्वप्नांमध्येच ‘लढतो’ ;

भल्या - भल्यांना दावूनी बुक्का

मैदान मी मारतो !

 

 

 

‘स्वप्नातुनी’ जागे होता

‘स्वप्न-किल्ला’ कोसळतो ;

दु:स्वप्नांचे जग हे सारे ,

मी ‘स्वप्नातुनी’ पाहतो !

No comments:

Post a Comment