Wednesday 28 March 2012

प्रिय राणी

 

 

 

रात्रीचा हा चंद्र रुसो वा,

बंद पडू दे ही मंद गाणी;

रुसोत सगळ्या राण्या ह्या,

पण, हसणार ही  प्रिय राणी !

 


 

 

विरह  दु:खी  मी कष्टी प्रियकर,

शोधीतसे मी ऋतू  राणी ;

डोळ्यात पाणी, मुखात गाणी,

पण, मनात माझ्या प्रिय राणी !

 

 

 

 

आसमंत ही दंग राहतो ,

जेव्हा खुलते ऋतू राणी;

मद-मदनिकाच भासते,

जेव्हा सजते प्रिय राणी !


 

 

 

मोहून टाकी प्रियकर सगळे,

अखेर वरते रुप राणी ;

वाचक असती प्रियकर सगळे,

'कविता' माझी  प्रिय राणी !

No comments:

Post a Comment