रात्रीचा हा चंद्र रुसो वा,
बंद पडू दे ही मंद गाणी;
रुसोत सगळ्या राण्या ह्या,
पण, हसणार ही प्रिय राणी !
विरह दु:खी मी कष्टी प्रियकर,
शोधीतसे मी ऋतू राणी ;
डोळ्यात पाणी, मुखात गाणी,
पण, मनात माझ्या प्रिय राणी !
आसमंत ही दंग राहतो ,
जेव्हा खुलते ऋतू राणी;
मद-मदनिकाच भासते,
जेव्हा सजते प्रिय राणी !
मोहून टाकी प्रियकर सगळे,
अखेर वरते रुप राणी ;
वाचक असती प्रियकर सगळे,
'कविता' माझी प्रिय राणी !